X
X

भाजपसाठी संघटना फक्त निवडणुकीचे यंत्र नव्हे- मोदी

READ IN APP

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे मराठीतून कौतुक

: भाजपची मजबूत पक्ष संघटना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी बनवलेले यंत्र नाही. भाजपसाठी संघटना म्हणजे लोकसेवेचे माध्यम असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पक्ष कार्यकर्त्यांसमोर केले.

करोनाच्या संकटात गेले तीन महिने राज्या-राज्यांमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जनसेवेचा आढावा मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षांनी करोना काळातील कामांचा अहवाल मांडला. चित्रवाणीसंवादाद्वारे झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे मराठीतून कौतुक

महाराष्ट्रात भाजपने केलेल्या कामांची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी या आढावा कार्यक्रमात दिली. त्यांना मोदींनी मराठीतून प्रतिसाद दिला. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार, या शब्दांत मोदींनी कौतुक केले.

20
X