जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांना चर्चेच्या प्रगतीचा तपशील दिला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही भाजप आणि पीडीपी एकत्र येण्याची तयारी सुरू झाली आहे.
सरकार स्थापन करण्याबाबत पीडीपीचे आमदार हसीब द्राबू भाजपशी चर्चा करीत असून त्यांनी व्होरा यांची भेट घेतली. त्यापूर्वी भाजपचे प्रभारी राम माधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व्होरा यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्होरा यांची भेट घेतल्यानंतर  निवेदन जारी करण्यात आले.