28 September 2020

News Flash

काँग्रेस जातीच्या आधारे देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतंय – प्रकाश जावडेकर

काँग्रेस नेते तरुण गोगोई यांच्या टीकेला प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस जातीच्या आधारे देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख भारताचे ‘हिंदू जिना’ असा केला. यावरुनच प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गेल्या अनेक दशकांपासून अल्पसंख्याकांचा मतांसाठी वापर करणारी काँग्रेस देशात जातीच्या आधारे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी हिंदू जिना असं केलेलं वक्तव्य काँग्रेसचा जातीय सलोखा बिघडवण्याचा अजून एक प्रयत्न आहे,”.

ज्येष्ठ काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. गोगोई यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला. त्यांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान आरोपी करतात की आम्ही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. पण त्यांनी आपला स्तर शेजारी राष्ट्रांपेक्षाही खाली आणला आहे. नरेंद्र मोदी जिना यांच्या दोन देश सिद्धांताच्या दिशेने वाटचाल करत असून भारताचे हिंदू जिना म्हणून उदयाला येत आहेत”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 2:13 pm

Web Title: bjp prakash javdekar congress tarun gogoi hindu jinnah narendra modi sgy 87
Next Stories
1 #JNUProtest: आझाद मैदानात पोलिसांनी तपासली विद्यार्थ्यांची ओळखपत्रे
2 केंद्र सरकारला दणका; अनिल अंबानींना द्यावे लागणार १०४ कोटी
3 JNU Protest : देशभक्तांना रोखण्याची तिची हिंमत कशी झाली -जावेद अख्तर
Just Now!
X