News Flash

Video : अमित शहांनी केले कुंभमेळ्यात स्नान

मोहन भागवत, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेत्यांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात हजेरी लावली आहे.

कुंभस्नानासाठी जगभरातील लाखो भक्त आणि साधू उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे हजेरी लावतात. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहेत. मोहन भागवत, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेत्यांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. आज बुधवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत कुंभमेळ्यात हजेरी लावली. यावेळी अमित शहा यांनी पवित्र त्रिवेणी संगमवर शाही स्नान केले. तसेच यावेळी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमावर आरती केली.

शाही स्नानानंतर अमित शहा यांनी सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या असून. येथील साधू-संतांशी चर्चा केली आहे. १९ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेच्या सहावे आणि शेवटचे स्नान महाशिवरात्रीला म्हणजेच ४ मार्चला शेवटचे शाही स्नान होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 6:09 pm

Web Title: bjp president amit shah cm yogi adityanath and other leaders take holy dip at kumbhmela
Next Stories
1 अंबानींना ३० हजार कोटी देण्यासाठीच राफेलचा नवा करार करण्यात आला : राहुल गांधी
2 सुप्रीम कोर्टात अनिल अंबानी- एरिक्सन वादावर राफेलची छाया
3 पाच वर्षात कोणताही राजकीय भूंकप आला नाही, मोदींचा राहुल गांधींना टोला
Just Now!
X