भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ते प्रचारासाठी आले होते. अंगात ताप असतानाही ते रॅलीत सहभागी झाले खरे मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अमित शाह पश्चिम बंगालमध्ये सभेसाठी गेले होते. त्यांना ताप आला असतानाही ते सकाळी एका रॅलीत सहभागी झाले. मात्र त्यावेळीही ते सारखे खोकतच होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी परतावं लागलं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आता पश्चिम बंगालमधील त्यांच्या नियोजित सभा रद्द होण्याची शक्यता आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मागच्याच आठवड्यात अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. शाह यांनी स्वतः ट्विट करून स्वाइन फ्लू झाल्याचे सांगितले होते. देवाचे आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमामुळे मी लवकर बरा होईन असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. एका काँग्रेस नेत्याने त्यांच्या आजाराची खिल्ली उडवल्याने काँग्रेसवर भाजपा नेत्यांनी टीकाही केली. आता आज पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे.