मतदारांना आकर्षित करून लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा पटकाविण्यासाठी भाजपने आता गुजराती अस्मितेचे कार्ड पुढे करण्याचे ठरविले आहे. ज्या भागांत पक्षाची स्थिती समाधानकारक नाही तेथे आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत केल्याप्रमाणे आता गुजराती अस्मितेचे कार्ड पुढे करण्यात येणार आहे.
पक्षाने मंगळवारपासूनच आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून गुजराती अस्मितेचे कार्ड पुढे करून पुढील पंतप्रधान गुजरातीच हवा, यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्याचे ठरविले आहे. ‘फुलसे अपडी छाती ज्यारे वडाप्रधान गुजराती’ आणि आपल्या नरेंद्रभाईंना पंतप्रधान करू या, अशा घोषणा त्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.