News Flash

पराभवावर भाजपमध्ये ‘चिंतन’

बिहारमध्ये पैसे वाटून भाजप नेते उमेदवारी देत असल्याचा गंभीर आरोप खासदार आर. के. सिंह यांनी केला होता.

भाजप

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपात सुरू झाले आहेत. बिहारमध्ये पैसे वाटून भाजप नेते उमेदवारी देत असल्याचा गंभीर आरोप खासदार आर. के. सिंह यांनी केला होता. सिंह यांच्यावर कारवाईची भाषा करणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सूर मवाळ झाला आहे. त्यांच्या सूचनेवरून केंद्रीय संघटन मंत्री रामलाल यांनी सिंह यांच्याशी पक्ष मुख्यालयात चर्चा केली. उमेदवारी वाटपावर केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे पुरावे देण्याची सूचना रामलाल यांनी सिंह यांना केली आहे.
सिंह यांनी सातत्याने पक्षविरोधी वक्तव्ये केली होती. एकीकडे पारदर्शी कारभाराची घोषणा करायची व दुसरीकडे गुन्हेगारांना उमेदवारी द्यायची, असा आरोप त्यांनी केला होता. बिहारमधील दारुण पराभवात उमेदवारी वाटपात झालेल्या गोंधळाचा मोठा वाटा असल्याच्या निष्कर्षांप्रत भाजप नेते आले आहेत. उमेदवारी वाटप केंद्रीय स्तरावरून झाले असले तरी प्रदेश स्तरावरून काही नावांसाठी दबाव आला होता, असे भाजप नेते खासगीत मान्य करू लागले आहेत. विशेष म्हणजे आर.के. सिंह यांच्या आरा मतदारसंघातील एकही विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेला नाही. स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा फटका भाजपला अनेक ठिकाणी बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 4:50 am

Web Title: bjp pulls up lawmaker rk singh for remarks on bihar polls
Next Stories
1 सच्छिद्र द्रवामुळे कार्बन वातावरणात जाण्याआधीच शोषण्याची सोय
2 राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याची हीच योग्य वेळ!
3 मोदींना हटविल्यास भारत-पाक चर्चा शक्य ; मणिशंकर अय्यर यांच्या विधानाने नवा वाद
Just Now!
X