News Flash

अनुच्छेद ३७०बाबत भाजपकडून जनजागृती

काश्मीरसह देशभरात १ सप्टेंबरपासून महिनाभर मोहिम

(संग्रहित छायाचित्र)

 

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कसा योग्य आहे, हे विशेषत जम्मू-काश्मीर तसेच उर्वरित भारतातील नागरिकांना समजावून सांगण्यासाठी भाजपने राष्ट्रव्यापी मोहीम आखली आहे. ही ‘अनुच्छेद ३७० जनजागृती मोहीम’ १ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून ती माहिनाभर राबवली जाईल.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, अनंतनाग अशी नऊ शहरे, उर्वरित भारतातील ३५ मोठी शहरे आणि ३७० निमशहरांमध्ये मंत्री, खासदार, भाजपचे पदाधिकारी जनसभा आयोजित करतील. अनुच्छेद ३७० आणि ३५-अ रद्द करणे हा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासात फारच कमी वेळा मतभेद बाजूला ठेवून लोकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे हा ऐतिहासिक क्षणांपैकी एक असल्याचा दावा केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे.

काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करून, खोऱ्यातील लोकांशी चर्चा न करता जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेषाधिकार काढून घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळालाही श्रीनगर विमानतळावर अडवण्यात आले होते. खोऱ्यातील संपर्क यंत्रणाही २० दिवसानंतर अजून पूर्ववत झाली नसल्याचा दावा केला जातो. काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत तीव्र टीका झाल्यामुळे भाजपच्या वतीने ‘सकारात्मक प्रचारा’चा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एक देश एक राज्यघटना’ हे गेल्या तीन पिढय़ांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. काश्मीर सचिवालयावर आता फक्त तिरंगा फडवला जात आहे. केंद्र सरकारच्या सर्व जनकल्याण योजना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होतील. अनुच्छेद ३७० काढून टाकल्याने काश्मिरी जनतेचाच फायदा होणार आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:45 am

Web Title: bjp raised awareness about article 370 abn 97
Next Stories
1 काश्मीर प्रश्न द्विपक्षीयच!
2 प्लास्टिकमुक्तीवर मोदी यांचा भर
3 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवे विझविण्यास जी-७ देशांची मदत
Just Now!
X