News Flash

भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक

खासदारपूत्रावर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. एका वाहन चोरी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.

भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक
मध्य प्रदेशमध्ये भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असे या खासदारांचे नाव असून सत्येंद्र हे त्यांच्या सुपूत्राचे नाव आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असे या खासदारांचे नाव असून सत्येंद्र हे त्यांच्या सुपूत्राचे नाव आहे. सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आपली कार भरधाव नेली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. या दरम्यान, पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने कार न थांबवता ती भरधाव नेली. यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या कारचा पाठलाग करून ती पकडली. पोलिसांसमोर तिनही युवक घाबरले होते. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यांना आतमध्ये अंमली पदार्थ सापडले.

या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधिक्षक परिहार म्हणाले की, खासदार सुपूत्रासह तीन युवकांना अंमली पदार्थासह अटक केली आहे. त्यांना आज (गुरूवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला.

संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सत्येंदवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार एका वाहन चोरी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 11:49 am

Web Title: bjp rajya sabha mp sampatiya uikeys son satendra was arrested for allegedly carrying smack in mandla
Next Stories
1 #BoycottChineseProducts: ‘दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवा, चीनी वस्तूंवर बंदी घाला’
2 भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर
3 दुबळे नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात – राहुल गांधी
Just Now!
X