News Flash

संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळला

कुमार म्हणाले की, विरोधकांना सोयीच्या विसराळूपणाचा रोग झाला आहे.

| November 22, 2017 02:45 am

भाजप संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यास विलंब करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळला असून सरकार डिसेंबरमध्ये अधिवेशन घेणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. यूपीएच्या काळातही अनेकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा पुढे मागे करण्यात आल्या होत्या असे त्यांनी स्पष्ट केले.

कुमार म्हणाले की, विरोधकांना सोयीच्या विसराळूपणाचा रोग झाला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीएच्या काळातही हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा प्रकार २००८ व २०१३ मध्ये झाला होता.

विधानसभा निवडणूक व अधिवेशन एकाच काळात येऊ नये यासाठी काळजी ही घेतली जात असते, पण असे काँग्रेसच्या काळातही झाले आहे त्यामुळे भाजप संसदेच्या हिवाळी अधिवेशनास  मुद्दाम विलंब करीत असल्याच्या आरोपत तथ्य नाही. काँग्रेस नैराश्यातून हे आरोप करीत असून गुजरात व हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे त्यातून काँग्रेस हतबल झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकार हिवाळी अधिवेशनास मुद्दाम विलंब करीत असल्याचा आरोप केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:45 am

Web Title: bjp reply to congress on parliament winter session 2017
Next Stories
1 मुगाबे अखेर पायउतार
2 सरसकट कर्जमाफी हवीच!
3 काँग्रेसने ट्विट केले पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद ‘मीम’; सर्व स्तरातून टीका
Just Now!
X