02 March 2021

News Flash

आसाममध्ये सत्तेवर आल्यास सीएए अंमलबजावणी नाही – राहुल

‘आसाम कराराने शांतता आणली आहे आणि तो राज्याचा संरक्षक आहे.

संग्रहीत

शिवसागर (आसाम) : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आसामला विभाजित करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. आपला पक्ष आसाम करारातील प्रत्येक तत्त्वाचे संरक्षण करेल आणि राज्यात सत्तेवर आल्यास सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) कधीही अंमलबजावणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जो लोकांचे ऐकेल अशा ‘स्वत:च्या मुख्यमंत्र्याची’ राज्याला आवश्यकता आहे; केवळ नागपूर व दिल्लीचे ऐकणाऱ्याची नाही; असे येत्या मार्च- एप्रिलमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असलेल्या आसाममध्ये पहिल्या जाहीर सभेला संबोधित करताना गांधी म्हणाले.

‘आसाम कराराने शांतता आणली आहे आणि तो राज्याचा संरक्षक आहे. या करारातील प्रत्येक तत्त्वाचे मी व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते संरक्षण करतील’, असे राहुल यांनी सांगितले. अवैध स्थलांतरण हा आसाममधील प्रश्न असल्याचे सांगून, तो संवादाच्या माध्यमातून सोडवण्याची राज्याच्या लोकांची क्षमता आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस राज्यात सत्तेवर आला, तर  सुधारित नागरिकत्व कायद्याची  राज्यात अंमलबजावणी केली जाणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 1:37 am

Web Title: bjp rss congress party rahul gandhi assam of the amended citizenship law akp 94
Next Stories
1 आणखी १३ मृतदेहांचा शोध
2 महाभियोगातून ट्रम्प मुक्त!
3 ‘टिवटिव’ थांबवा, ‘कू-कू’चा बोलबाला!
Just Now!
X