News Flash

विधानभवनात नमाजासाठी विशेष खोली; झारखंडमध्ये गदारोळ

झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या विशेष खोलीच्या वादावरून गोंधळ झाला

Ruckus in Jharkhand assembly over namaz room
सभापतींनी सभागृह दुपारी १२.४५ पर्यंत तहकूब केले होते (photo pti)

आज (सोमवार) झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या विशेष खोलीच्या वादावरून गोंधळ झाला. अधिवेशनापूर्वी, विरोधी भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवर बसून हनुमान चालीसा आणि “हरे राम” चा पठण करत आंदोलन केले. तसेच कार्यवाही दरम्यान सभागृहाच्या वेलमध्ये जात जय श्रीराम म्हणत घोषणा दिल्या.

या दरम्यान, भाजपा सदस्यांनी नमाज अदा करण्यासाठी विशेष खोलीचा आदेश मागे घेण्याची मागणी करत होते. त्यानंतर अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी भानु प्रताप शाही यांच्यासह इतर भाजप सदस्यांना “त्यांच्या जागांवर परत जा” असे आवाहन केले. “तुम्ही चांगले सदस्य आहात. कृपया अध्यक्षांना सहकार्य करा”, असे ते म्हणाले.

मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृह दुपारी १२.४५ पर्यंत तहकूब केले होते. या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री सोरेन आणि सभापतींचे पुतळे देखील जाळले होते.

सभापतींनी नमाज अदा करण्यासाठी खोली क्रमांकाची विशेष खोली (TW ३४८) दिली आहे. त्यामुळे भाजपाने याला जोरदार विरोध केला आहे. तसेच भाजपने विधानसभा परिसरात हनुमान मंदिर आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्याची मागणी देखील केली आहे.  विधानभवनात नमाजासाठी खोली देणे असंवैधानिक असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 5:18 pm

Web Title: bjp ruckus in jharkhand assembly over namaz room srk 94
Next Stories
1 हेटेरो ग्रुपच्या करोनावरील औषधाला डीसीजीआयची मंजुरी
2 पात्र लोकांना लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य: पंतप्रधान मोदी
3 २४ वर्षांपासून बंद लिफ्ट उघडली अन् धक्काच बसला; पोलिसांना घ्यावी लागली घटनास्थळी धाव
Just Now!
X