श्रीनगरच्या एका सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचं कारण म्हणजे हा व्यक्ती पोलिसांपासून वाचवण्यासाठी लोकांकडून पैसे उकळायचा. हा व्यक्ती कोणी भुरटा चोर नसून एका गावचा सरपंच आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या सरपंचाचं नाव निसार अहमद खान असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. तो श्रीनगरमधल्या गोपालपोरा या भागाचा सरपंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग पोलिसांनी दहशतवादाच्या संशयावरुन दोन तरुणांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या दोघांना पोलिसांनी पकडल्यावर हा सरपंच त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आला. त्याने या दोघांच्या नातेवाईकांना सांगितलं की तो त्या दोघांना सोडवून आणू शकतो.

आणखी वाचा- Maharashtra Lockdown: लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले….

पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असल्याचं सांगून त्या नातेवाईकांकडून एक लाख १० हजार रुपये घेतले. तर इकडे पोलीसांना या दोघांच्याही चौकशीत काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे पोलीसांनी त्यांना सोडून दिलं. तेव्हा पोलीसांना कळलं की या सरपंचाने पोलीसांच्या नावे नातेवाईकांकडून पैसे घेतले आहेत. अधिक तपासानंतर त्यांना कळालं की, या सरपंचाने एका पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता.

आणखी वाचा- मोदी २.० सरकार सर्वेक्षण : हो, मोदी सरकारने करोनापेक्षा निवडणुकांना दिलं अधिक महत्त्व

त्यावर त्या अधिकाऱ्याने सरपंचाला सांगितलं की, त्या दोघांना फक्त तपासासाठी बोलवण्यात आलं आहे. निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना दोघांनाही सोडून देणार आहोत. त्यानंतरही या सरपंचाने पोलीसांच्या नावाखाली या दोघांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले.

पोलीसांनी या प्रकरणात सरपंचाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता अधिक तपास करत आहेत. या सरपंचाने अजून कोणाकोणाकडून किती पैसे घेतले आहेत हे शोधून काढणं गरजेचं असल्याचं पोलीसांनी सांगितलं.