24 September 2020

News Flash

काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवद्यांकडून गोळ्या घालून हत्या, ४८ तासातील दुसरा हल्ला

२० मीटर अंतरावरुन दहशतवाद्यांनी केला गोळीबार

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भाजपाशी संबंधित सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. काझीगुंड येथील राहत्या घरी सजाद अहमद यांची हत्या करण्यात आली. सजाद आपल्या घराबाहेर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “सजाद यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. इतर सरपंचांसोबत सज्जाज सुरक्षित असलेल्या निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. आज सकाळी कॅम्प सोडून ते आपल्या घरी गेले होते. २० मीटर अंतरावरुन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचं निधन झालं आहे”.

भाजपाशी संबंधित नेत्यावर झालेल्या ४८ तासातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी पंचायत सदस्य आरिफ अहमद खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:25 pm

Web Title: bjp sarpanch shot dead in south kashmir sgy 87
Next Stories
1 UNSC मध्ये काश्मीर मुद्दावरुन चीन-पाकिस्तान दोघेही पडले तोंडावर
2 काश्मीर मुद्द्यावर पत्रक प्रसिद्ध करण्यापुरता टर्कीचा भारत विरोध मर्यादित नाही तर..
3 कानामागून आल्या, पण..
Just Now!
X