भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचे नाव भारतीय नाही. शाह हा पर्शियन श्बद आहे. त्यामुळे भाजपाने अमित शाह यांचेही नामांतरण करावे अशी मागणी इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनंने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपाने सत्तेत आल्यापासून अनेक शहरांचे नामांतरण केले आहे. त्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता इरफान हबीब यांनी थेट शाह यांनी आपले नाव बदलावे असा सल्ला दिला आहे.

नाव बदलण्याची सुरुवात भाजपाने पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून करायला हवी. त्यांच्या नावातील ‘शाह’ हा शब्द संस्कृत नसून पर्शियन असल्यानं त्यांनी यामध्ये बदल करायला हवा, असे हबीब यांनी म्हटले आहे. सध्या शहरांचं आणि रस्त्यांचं नामांतरण हे भाजपाच्या हिंदुत्व विचारधारेचा एक भाग आहे. मग, असं असेल तर ‘शाह’ या शब्दाचा उगम फारशी आहे. मग भाजपाने अमित शाह यांचेही आडनावही बदलावं असा त्यांनी टोमणाही हबीब यांनी मारला आहे.

कोणत्या शहरांची नावे बदलली

अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला उत्तर प्रदेश सरकारकडून मिळाला होता. ज्या जागांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावास सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंदरीचे राजामहेंद्रवरम, ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील आऊटर व्हिलरला एपीजे अब्दुल कलाम आयलँड, केरळमधील मलप्पुरा जिल्ह्यातील एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील जिंद जिल्ह्यातील पिंडारीचे पांडु-पिंडारा नामकरण करायचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील लांडगेवाडीला नरसिंहगाव, हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील गढी सांपलाचे सर छोटू राम नगर, राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यातील खाटू कलागावाला बडी खाटू, मध्य प्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यातील महगवां छक्का गावाचे महगवां सरकार आणि महगवां तिलियाचे महगवां घाट, उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरनगरचे शुक्रताल, खादरचे सुखतीर्थ खादर आणि शुक्रताल बांगरचे सुखतीर्थ बांगर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.