News Flash

शरद पवारांची भाजपासह पंतप्रधान मोदींवर गंभीर टीका, म्हणाले…

रांची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेतून साधला निशाणा

संग्रहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “भाजपाच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी सवड आहे मात्र २० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही.” आज(रविवार) रांची येथील हरमू मैदानात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, “बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. मात्र दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 2:34 pm

Web Title: bjp spreading communal poison in country sharad pawar msr 87
Next Stories
1 एप्रिलपासून आयपीएलचा थरार! ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर रंगणार जेतेपदाची लढत
2 ‘फोगट’ कन्येने जिंकले सुवर्ण; नंबर वन स्थान पुन्हा कायम
3 चर्चेवर शिक्कामोर्तब! मिथून चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश
Just Now!
X