News Flash

…तर स्मशानात पाठवू; भाजपा नेत्याची तृणमूलच्या कार्यकर्त्यांना उघड धमकी

"हात, पाय आणि डोके फुटतील"

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. पुढच्या वर्षी निवडणूक होत असून, राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. भाजपानंही पश्चिम बंगालकडे मोर्चा वळवला असून, ममता बॅनर्जी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. अशातच भाजपाच्या नेत्यानं तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट स्मशानात पाठवण्याचीच धमकी दिली आहे.

भाजपानं पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मागील काही वर्षांपासून भाजपानं बंगालमध्ये पक्ष विस्ताराचं काम हाती घेतलं. त्याचे काही परिणाम मागील काही निवडणुकींमध्ये दिसूनही आले. मात्र, यात आता भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाजपानं तृणमूलवर आरोप केले होते.

दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी हल्दीयामध्ये झालेल्या एका सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचीच धमकी दिली. पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी केंद्र सरकार काळजी घेईल. विधानसभा निवडणुकीत राज्य पोलीस नव्हे, तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्था असेल,” असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- तृणमूल सरकारची मृत्युघंटा वाजल्याची जाणीव – गृहमंत्री

“मी ममता दीदीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, जे वाईट गोष्टी करत आहेत. त्यांनी ६ महिन्यात स्वतःमध्ये बदल करावेत, नाहीतर त्यांचे हात, पाय आणि डोके फुटतील. घरी जाण्याआधी तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल. जर त्यांनी जास्त त्रास दिला, तर त्यांना स्मशानभूमीत पाठवलं जाईल,” असा इशारा देत घोष यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

आणखी वाचा- बिरसा मुंडांऐवजी अमित शाहांनी दुसऱ्याच प्रतिमेला केलं अभिवादन; तृणमूलने म्हटलं हे तर ‘बाहेर’चे

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पुढील वर्षी निवडणूक होत असून, भाजपानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 9:51 am

Web Title: bjp state president dilip ghosh warns tmc cadres bmh 90
Next Stories
1 बायडेन यांच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव; शुभेच्छा देताना इम्रान यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा
2 चिनी गुंतवणूक असलेल्या ‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती चोरली
3 आठ वर्षांचा तुरुंगवास भोगताना घेतल्या ३१ पदव्या; सुटका होताच मिळाली सरकारी नोकरी
Just Now!
X