बिहार निवडणुकांतील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडून होणाऱ्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांनी स्वताच्या राजकीय शक्तीचे आकलन निवडणूकातील निकालावरून करावे आणि मगच भाजपवर टीका करावी, असा टोलाही भाजपने लगावला आहे. भाजपचे प्रवक्ते विजय बहाद्दूर म्हणाले, मायावती आज सत्तेचा दाव करीत आहेत. पण बसपाला बिहार विधानसभा निवडणुकीत केवळ दोन टक्केच मते पडली आहेत. मायावतींनी स्वत:च्या मूल्यमापन पहिल्यांदा करावे. बसपातील कार्यकर्ते नैराश्याने ग्रासले आहेत. त्यावर उपाय म्हणून मायावती सध्या भाजपवर टीका करीत आहेत. कारण त्यांना विरोधकांवर टीका केल्यास पक्षातील नैराश्य दूर होईल, असे वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.