News Flash

मायावतींचे राजकारण हे पैशाचे व खालच्या पातळीचे: भाजप

मायावती सरकार काळात राज्यात ३० हजार दलितांवर अत्याचार झाले.

बसपाच्या सर्वोसर्वा मायावती दलित मुद्यावरुन राजकारण करुन संपत्ती जमा करत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी संगन मताने राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत या दोन्ही पक्षांना जनतेला हिशोब द्यावा लागेल असे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे. विकास विरोधी आणि दलित विरोधी पक्षांना केंद्रसरकारचे यश सलत असून भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी ही मंडळी एकत्रीतपणे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे देखील शर्मा म्हणाले.  उत्तरप्रदेशमध्ये  मायावती यांचे सरकार असताना ३० हजार दलितांवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याचे सांगत मायावतीच दलितांवर राजकारणासाठी वापर करत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. राज्यात बोगस शिधा पत्रिकाच्या प्रकरणात देखील बहुजन पार्टी आणि समाजवादी पार्टीचा हात असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला आहे.  दलितांच्या नावावर राजकारण करुन पैसा कमावणे हा बहुजन समाज पार्टी  आणि समाजवादी पार्टीने व्यापार चालाविला असल्याचे भाजपाने म्हटले आहे.  बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी आग्रातून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढविला होता. आग्रामधील सभेत मायावतींनी पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला होता. भाजप सरकार दलितांचे आरक्षण काढून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेवर भाजपने सडेतोड उत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 6:52 pm

Web Title: bjp target mayawati up dalit politics
Next Stories
1 आर्थिक विंवचनेतून राष्ट्रीय महिला खेळाडूची आत्महत्या, मोदींच्या नावे लिहिली चिठ्ठी
2 देशविरोधी विचाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवता येणार नाही: अमित शहा
3 मुंबईतील पाच जणांनी आयसिसमध्ये जाण्यासाठी देश सोडला
Just Now!
X