22 October 2020

News Flash

‘हिंदू पाकिस्तान’ वादप्रकरणी भाजपाकडून जिवे मारण्याची धमकी-थरूर

शशी थरूर यांचा कार्यालय फोडणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

हिंदू पाकिस्तानचे वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला. आजच भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शशी थरूर यांचे थिरूअनंतपुरम येथील कार्यालय फोडले. त्यानंतर याच कार्यकर्त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप शशी थरूर यांनी केला. माझ्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर त्यावर पाकिस्तान असे काळ्या अक्षरात लिहिण्यात आले. काही दिवसांपूर्वीच २०१९ मध्ये भाजपाची सत्ता आल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे वक्तव्य शशी थरूर यांनी केले होते. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशीही मागणी भाजपाने केली होती.

आता शशी थरूर यांच्या याच वक्तव्यावरून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शशी थरूर यांचे कार्यालय फोडले. हे कार्यालय फोडल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. माझ्या कार्यालयाबाहेर जो प्रकार झाला तो भाषण स्वातंत्र्यावर आलेली गदा आहे असे मला वाटते असेही थरूर यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवल्याचेही स्पष्ट केले आहे.

आज जेव्हा थरूर यांचे कार्यालय फोडण्यात आले तेव्हा ते कार्यालयात नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी थिरूअनंतपुरम येथील कार्यालयाची तोडफोड केली. काळ्या शाईने या ठिकाणी पाकिस्तानचे कार्यालय असे बोर्ड रंगवले. भाजपाला तोडफोड, विटंबना आणि हिंसेची संस्कृती रूजवायची आहे हेच कृतीततून समोर आल्याचेही थरूर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 6:50 pm

Web Title: bjp threatened to kill me to shut down my mp office says shashi tharoor
Next Stories
1 ‘डान्सिंग अंकल’च्या मेहुण्यावर भर रस्त्यात झाडल्या गोळ्या
2 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुमारस्वामींना जाहीर, भाजपाने उडवली खिल्ली!
3 FB बुलेटीन: खड्ड्यांविरोधात मनसेचं खळखट्याक आणि छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली यासह अन्य बातम्या
Just Now!
X