देशातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागत केले. 
अफजलला फाशी देण्यास उशीर झाला असला, तरी त्याचे स्वागतच केले पाहिजे. सर्वांनाच फाशीच्या अमलबजावणीची प्रतिक्षा होती. भारत हा कायम दहशतवादाविरोधात उभा असल्याचे फाशीच्या अमलबजावणीमुळे दिसले आहे, असे पक्षाचे प्रवक्ते राजीवप्रताप रुडी यांनी पत्रकारांना सांगितले.
दहशतवादी कारवायांमागील सूत्रधारांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सरकारवर कायम दबाव टाकला आहे. दहशतवाद्यांविरुद्धची कोणतीही कारवाई तातडीनेच व्हायला हवी. त्यामध्ये विलंब लागू देऊ नये, अशी अपेक्षा रुडी यांनी व्यक्त केली.