News Flash

“पश्चिम बंगालमधल्या विजयाची खात्री; भाजपा विजय व्हर्च्युअली साजरा करणार”

निवडणूक आयोगाने निकालानंतरच्या विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे.

निवडणूक आयोगाने २ मेच्या निवडणूक निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. आयोगाच्या या निर्णयाचं भाजपाने स्वागत केलं आहे. भाजपाचे महासचिब तरुण चुघ यांनी याविषयी एएनआयशी बातचित केली आहे. ते म्हणतात, “पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाची आम्हाला खात्री आहे. एक जबाबदार पक्ष म्हणून आम्ही हा क्षण निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळून साजरा करु. आम्ही पाच राज्यांमध्ये प्रचार करतानाही करोनासंदर्भातले सर्व नियम पाळले होते. तशाच पद्धतीने आम्ही या आदेशाचंही पालन करु आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत आमचा विजय व्हर्चुअली साजरा करु”.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी घालण्याचा निर्णयाचं स्वागत करत आहे. मी पक्षाच्या सर्व राज्यातल्या शाखांना या आदेशाचं पालन करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने या संकटकाळात सर्वसामान्याची सेवा करत राहू”.

देशात एकीकडे करोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे पाच राज्यांमधील निवडणूकदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही या राज्यांमध्ये सुरु असलेल्या प्रचारसभा आणि गर्दी यामुळे नाराजी जाहीर होत आहे. त्यातच मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दांत फटकारलं आहे.

त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 8:24 pm

Web Title: bjp will celebrate victory virtually said bjp official vsk 98
Next Stories
1 Oxygen Shortage : वडिलासांठी ऑक्सिजन सिलिंडर खांद्यावर उचलून रूग्णालयात आणावं लागलं
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन यांचं करोनाने निधन
3 “परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”- उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावलं!
Just Now!
X