News Flash

भाजपाला मोठा रसगुल्ला मिळणार; ममतांचा अमित शाह यांच्यावर प्रतिहल्ला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

अमित शाह व ममता बॅनर्जी. (संग्रहित छायाचित्र)

पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्या, तरी यात सर्वात जास्त चर्चा सुरू ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची! केंद्रासह अनेक राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपानं बंगाल काबिज करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं असून, ममतांच्या तृणमूलला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. या दाव्यावरून ममतांनी शाह यांना टोला लगावला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. बंगालमध्ये भाजपा दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला होता. शाह यांच्या या दाव्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- मुख्यमंत्रीपदासाठी मिथून तयार

चंदीपूर येथील प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “भाजपा सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीसाठी सोडल्या आहेत का? पण, भाजपाला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे,” असा टोला ममतांनी लगावला आहे. “पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजपा असे दावे का करत आहे. केंद्रीय संस्थांनीही उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावं. लोकांना भाजपाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये,” अशी टीकाही ममतांनी केली.

काय म्हणाले होते अमित शाह?

“पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर कार्यकत्र्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपाची भगवी लाट आल्याचे संकेत मिळाले. पहिल्या टप्प्यात तेथे ३६ जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपाला मिळतील आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला २०० हून अधिक जागा मिळतील, असं शाह म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:38 pm

Web Title: bjp will get a big rosogolla mamata attack on amit shah bmh 90
Next Stories
1 राजस्थान दिनाच्या निमित्ताने गेहलोत सरकारची कैद्यांना विशेष भेट
2 सुएझ कालव्याने घेतला मोकळा श्वास! एव्हर गिव्हन जहाज काढण्यात अखेर यश
3 चार कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार?
Just Now!
X