News Flash

भाजपा आता सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार: राहुल गांधी

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन राज्यपाल वाला यांचा निर्णय अयोग्य असल्याचे स्पष्ट होते. बहुमत नसतानाही सत्तास्थापन करण्याचा भाजपाचा डाव न्यायालयाने हाणून पाडला

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

सुप्रीम कोर्टाने शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ‘भाजपाला कायद्याने रोखले आहे. पण आता सत्तास्थापनेसाठी भाजपा पैसा व बळाचा वापर करणार’ अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, अखेर संविधानाचा विजय झाला असून लोकशाही वाचली. येडियुरप्पा आता एक दिवसाचेच मुख्यमंत्री ठरतील. कर्नाटकच्या राज्यपालांचा संविधानविरोधी निर्णय हायकोर्टाने फेटाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन राज्यपाल वाला यांचा निर्णय अयोग्य असल्याचे स्पष्ट होते. बहुमत नसतानाही सत्तास्थापन करण्याचा भाजपाचा डाव न्यायालयाने हाणून पाडला. आम्ही भाजपाला कायद्याच्या चौकटीत राहुनच थांबवले. पण आता ते सत्तेसाठी पैसा व बळाचा वापर करणार, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आजवर कोणत्याही राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी २ आठवड्यांचा कालावधी दिला नाही. कर्नाटकच्या राज्यपालांनी संविधानातील मूल्यांचा अपमान केला असून आज सुप्रीम कोर्टाने लोकशाहीचे संरक्षण केले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:12 pm

Web Title: bjp will now try money and muscle to steal mandate says rahul gandhi after supreme court verdict
Next Stories
1 उद्या आम्ही १०० टक्के बहुमत सिद्ध करुन दाखवणार – बी.एस.येडियुरप्पा
2 karnataka election: ..अन् सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी सांगितला व्हॉट्स अॅपवरील विनोद
3 पदभार स्वीकारताच येडियुरप्पांनी पोलीस खात्यात केले महत्वाचे फेरबदल
Just Now!
X