News Flash

विवाहबाह्य संबंधांचा संशय, भाजपाच्या महिला नेत्याची नवऱ्याने केली हत्या

मुनेश फोनवरुन लहान बहिणीबरोबर बोलत असताना, तिच्यावर गोळया झाडण्यात आल्या.

नवऱ्यानेच पत्नीवर गोळया झाडून तिची हत्या केली. दिल्लीत गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. पत्नी फोनवरुन तिच्या कुटुंबियांबरोबर बोलत असताना नवऱ्याने तिच्यावर गोळया झाडल्या. गुरुग्रामच्या सेक्टर ९३ मध्ये ही घटना घडली. मुनेश गोदारा असे मृत महिलेचे नाव आहे. ती भाजपाची पदाधिकारी होती.

गुरुग्राममध्ये हे जोडपे भाडयाच्या घरामध्ये राहत होते. “मुनेश फोनवरुन लहान बहिणीबरोबर बोलत असताना, तिच्यावर गोळया झाडण्यात आल्या. नवऱ्याने आपल्यावर गोळया झाडल्याचे तिने फोनवरुनच बहिणीला सांगितले” अशी माहिती मुनेशचा भाऊ एसके जाखर यांनी दिली.

मुनेश या भाजपा किसान मोर्चाच्या राज्य सरचिटणीस होत्या. आपला मुलगा आणि सून हाऊसिंग सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होते असे मुनेशचे सासरे चंद्रभान यांनी गुरुग्राम पोलिसांना सांगितले.

स्थानिक भाजपा नेत्यासोबत प्रेम प्रकरण?
आरोपी सुनील धनवापूर येथील इंडस्ट्रीयल युनिटमध्ये सुरक्षा अधिकारी पदावर नोकरी करतो. स्थानिक भाजपा नेत्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा सुनीलला संशय होता. सुनील सतत संशय घेत असल्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुनच सुनीलने पत्नीवर गोळया झाडल्या.

दिल्लीमध्ये उमेदवारांसाठी केला होता प्रचार
शनिवारी सुनील दारु पिऊन आला होता. त्यांच्यामध्ये रात्री जोरदार भांडण झाले होते अशी माहिती आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. मुनेश किचनमध्ये गेली व तिने कोणालातरी फोन लावला. तितक्यात सुनीलने बंदुक उचलली व पत्नीवर गोळया झाडल्या. मुनेशचा जागीच मृत्यू झाला. सुनीला फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुनेशने भाजपा उमेदवारांसाठी प्रचार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 12:32 pm

Web Title: bjp woman leader shot dead by husbund gurugram dmp 82
Next Stories
1 भाजपा-आरएसएस आरक्षणविरोधी, त्यांना एससी/एसटी समाजाचा विकास नकोय : राहुल गांधी
2 अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल; सर्वोच्च न्यायालयाकडून दुरूस्तीला हिरवा कंदिल
3 “आर्थिक मंदी असती तर आपण धोतर घालून फिरलो असतो”; भाजपा नेत्याचे वक्तव्य
Just Now!
X