हरियाणात काँग्रेसने सलग दोनदा सत्ता मिळवून राज्य केल्यामुळे ‘अँटी-इन्कम्बन्सी’च्या तत्वानुसार काँग्रेसविरोधात जनमत तयार झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या घटकाचा फायदा उचलण्याच्या तयारीत असलेल्या भाजपपुढे सध्या एक नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे. सध्या हरियाणामध्ये कुलदीप बिष्णोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेस पक्षाबरोबर भाजपची युती आहे. मात्र, येत्या निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जास्तीत जास्त पक्षांना रालोआमध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ओमप्रकाश चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोक दलाबरोबर युती करण्याचा भाजपचा विचार आहे. मात्र, चौटाला आणि बिष्णोई यांच्यात असणारे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रूत आहे. कुलदीप बिष्णोई भाजपचा भाग असेपर्यंत युतीत समाविष्ट होण्यास चौटाला यांनी नकार दिला आहे. तर कुलदीप बिष्णोई यांनीसुद्धा ओमप्रकाश चौटाला यांच्याशी संबंध जोडल्यास भाजपबरोबरची युतीमधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:51 am