धर्मांतरावर बंदी येईपर्यंत घरवापसी सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केले. भारतापुढे कुपोषण अथवा गरिबी ही खरी समस्या नसून छुप्यापद्धतीने जिहादीकरण सुरू करून ‘व्होट बँक’चे राजकारण पुढील काळात देशासाठी घातक आहे. त्यामुळे धर्मांतरावर बंदी येणार नसेल तर, ‘घरवापसी’ सुरूच रहावी असे आपले स्पष्ट मत असल्याचे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. ते विश्व हिंदू परिषदेने(विहिंप) आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
‘घरवापसी’वर टीका होते मग, लव्ह जिहाद आणि मुस्लिम भागात राष्ट्रविरोधी भावनांना बढावा देणाऱयांच्या बाबतीत का नाही? याचे स्वत:ला सेक्यूलर समजणाऱयांनी उत्तर द्यावे, असेही ते पुढे म्हणाले. देशातील मुस्लिम परिसरात देशाविरोधातील वक्तव्ये का होतात? मुस्लिम परिसर नेहमी असुरक्षित का वाटतो? असे सवाल देखील आदित्यनाथ यांनी यावेळी उपस्थित केले. हिंदू धर्मातील प्रत्येक नागरिक आज सुरक्षित आहेत. इतर कोणत्याही धर्मापेक्षा हिंदू धर्म जास्त सुरक्षित असल्याची हमी देतो, असेही आदित्यनाथ यांनी म्हटले.