News Flash

भाजपा नेते किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पक्षविरोधी कारयावा केल्याने आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती.

भाजपाचे माजी मंत्री किर्ती आझाद यांनी आज (दि.१८) पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षविरोधी कारयावा केल्याने आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती.

आझाद हे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात त्यांचा मुकाबला पारंपारिक लढत असणाऱ्या भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत होणार आहे.

किर्ती आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र आहेत. यावेळी दरभंगातून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. आझाद यांनी २०१४ मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा ३४,००० मतांनी पराभव केला होता. त्यावेळी जदयूचे उमेदवार संजय कुमार झा हे तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, यावेळी झा जदयूच्या तिकीटावरुन एनडीएचे उमेदवार म्हणून इथून उभे राहणार आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद यांनी युती केली आहे. मात्र, त्यांचे जागा वाटप अजून व्हायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 3:57 pm

Web Title: bjps suspended leader kirti azads entry into congress
Next Stories
1 Pulwama Terror Attack: एसबीआयने २३ शहीद जवानांचे कर्ज केले माफ
2 देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी नियमावली जाहीर
3 ना जात, ना धर्म; असं प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय महिला
Just Now!
X