तरुणीला संमोहित करण्यासाठी एका ४० वर्षीय व्यक्तीने घुबडाचा बळी दिला. दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये ही घटना घडली. कन्हैया असे आरोपीचे नाव असून तो ट्रक ड्रायव्हर आहे. पोलिसांनी ११ नोव्हेंबरला त्याला अटक केली. टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला. त्यावेळी घराच्या कुलरमध्ये घुबडाचा मृतदेह सापडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकशी दरम्यान आरोपी कन्हैया उडवाउडवीची उत्तरे देत होता. नंतर त्याने पोलिसांना तंत्र विद्येचा एक व्हिडिओ दाखवला. घुबडाचा बळी दिल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला संमोहित करु शकता असा त्याचा दावा होता. त्या अंधश्रद्धेतून त्याने घुबडाची हत्या केली. कन्हैयाला तो रहात असलेल्या भागातील एक तरुणी आवडत होती. तिला आकर्षिक करण्यासाठी म्हणून त्याने घुबडाचा बळी देण्याचा हा विधी केला.

आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. दिवाळीनंतर तो घुबडाचा बळी देणार आहे हे त्याच्या कुटुंबियांना माहित होते असे अधिकाऱ्याने सांगितले. कन्हैयाच्या वडिलांचा सुद्धा दिवाळी दरम्यान मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black magic man kills owl to attract woman
First published on: 13-11-2018 at 20:37 IST