News Flash

यूपीए सरकारच्या कार्यकाळात ५०५ अब्ज डॉलरची रक्कम देशाबाहेर

देशातून प्रचंड प्रमाणावर काळा पैसा बाहेर जाण्याच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो

| March 14, 2016 12:35 am

२००४ ते २०१३ दरम्यान, म्हणजे यूपीए सरकारच्या कार्यकाळात ५०५ अब्ज डॉलर इतका काळा पैसा देशाबाहेर पाठवण्यात आला काय, याची शहानिशा करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास सुरू केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ने निर्देश दिल्यानंतर डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सचा (डीआरआय) हा तपास सुरू होत आहे.
देशातून प्रचंड प्रमाणावर काळा पैसा बाहेर जाण्याच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो आणि २००४ ते २०१३ या कालावधीत दरवर्षी ५१ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम दरवर्षी बाहेर पाठवण्यात आली, असे अमेरिकेतील ‘ग्लोबल फायनान्स इंटीग्रिटी’ (जीएफआय) या थिंक टँकच्या अहवालात नमूद केले होते. त्याच्या आधारे हा तपास करण्यात येत आहे. डीआरआयच्या तपासाचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष तपास पथक या संदर्भात योग्य ती कार्यवाही करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2016 12:35 am

Web Title: black money dri probes illicit outflow of 505 billion
टॅग : Black Money
Next Stories
1 गोल्डमॅन सॅकचे माजी संचालक रजत गुप्ता यांची तुरुंगातून मुक्तता
2 माहिती अधिकारात लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मंत्री बांधील
3 सद्य:स्थितीत न्यायसंस्थेची विश्वासार्हता धोक्यात!
Just Now!
X