मध्यंतरी तिथे मोटारींच्या खरेदीचे रेशनिंग करण्याची वेळ आली होती. सध्या तिथे एका पर्यावरण समस्येने सर्वाना काळजीत टाकले आहे. तेथील संपूर्ण वातावरणात वाहनांच्या व कारखान्यांच्या धुराची काजळी पसरली आहे.
धुक्याचे काळे ढग
* जानेवारी महिन्यात बीजिंगमध्ये राखाडी व तपकिरी
रंगाचे धुके सगळीकडे पसरले आहे.
* हवेची स्थिती खूप वाईट असून दोनशे फूट  अंतरावरचेही दिसत नाही.
* प्रदूषणाचा निर्देशांक आहे ५१७, म्हणजे सर्व  धोक्याच्या पातळ्यांपेक्षा तो अधिक आहे.
* प्रदूषणाची पातळी ५२६ मायक्रोग्रॅम (पीपीएम)  जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित पातळीपेक्षा  वीस पट अधिक.
बीजिंगची स्थिती
बीजिंगची लोकसंख्या    २.२० कोटी (शांघायनंतर लोकसंख्येत क्रमांक दोन).
वाहनांची संख्या           ५२ लाख (२०१५ पर्यंत ६० लाख). रोज दोन हजार मोटारींची खरेदी.
प्रदूषण                    नायट्रोजन ऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण  जास्त.
कारखाने                 इलेक्ट्रॉनिक्स, औषधे व इतर जड उद्योग.
वैद्यकीय उपाय          ९००० मुलांवर प्रदूषणामुळे उपचार. फ्लू, न्यूमोनिया, अस्थमा या विकारात वाढ.
सोशल नेटवर्किंगवर जनजागृती
* चायना सेंट्रल टेलिव्हिजनवर सतत प्रदूषण बातमीपत्रे.
* स्वच्छ हवा मोहिमेसाठी ब्लॉगर पॅन शियी यांना सिना वेबोवर (चीनचे ट्विटर) १.४ कोटी समर्थक.
*    ४३ हजार लोकांचे नवीन कायद्याच्या बाजूने मतदान.
* स्वच्छ हवा कायद्यात मोटारींवर नियंत्रण, वाहनमुक्त  दिवस उत्सर्जनाबाबत कडक नियम यांचा समावेश
सरकारी उपाययोजना
* प्रशासनानेही   लोकांना खिडक्या दारे बंद करून घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.
*  समतोल आहार व भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही दिला आहे.
* वेळ पडली तर मास्क  लावावेत
*  १०३  कारखाने  तातडीने  बंद  करण्याचा आदेश.