News Flash

स्मार्टफोन जंतूमुक्त करण्याची ब्लॅकबेरीची योजना

स्मार्टफोनवरचे जंतू घालवण्यासाठी स्मार्टफोनवर किंवा मोबाइल फोनवरचे घातक जंतू घालवण्यासाठी खरेतर फोन बदलण्याचे काही कारण नाही फक्त रोज सकाळी, दुपारी व रात्री तो एकदा अल्कोहोलमध्ये

| June 28, 2015 05:19 am

स्मार्टफोनवरचे जंतू घालवण्यासाठी स्मार्टफोनवर किंवा मोबाइल फोनवरचे घातक जंतू घालवण्यासाठी खरेतर फोन बदलण्याचे काही कारण नाही फक्त रोज सकाळी, दुपारी व रात्री तो एकदा अल्कोहोलमध्ये बुडवलेल्या टिश्यू पेपरने हलक्या हाताने पुसून काढा आपण नेहमी वापरतो त्या स्मार्टफोनवर लाखो प्रकारचे जंतू असतात, त्यामुळे रुग्णालयांमध्ये स्मार्टफोन किंवा मोबाइल फोन वापरणे हिताचे नसते कारण त्यामुळे रोगप्रसार होऊ शकतो. यापूर्वी तर वैज्ञानिकांनी स्मार्टफोनमध्ये टॉयलेटइतके जंतू असतात, असेही म्हटले होते पण अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी त्यावर लाखो जंतू असतात याबाबत दुमत नाही, त्यामुळे आता ब्लॅकबेरी या कॅनेडियन कंपनीने ब्लॅकबेरीचा असा स्मार्टफोन विकसित करण्याचे ठरवले आहे ज्यावर जंतू नसतील, त्यामुळे तो फोन रुग्णालयांमध्येही वापरता येणार आहे.
ब्लॅकबेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन शेन यांनी सांगितले, की आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व डॉक्टर यांच्या दृष्टीने मोबाइल जीवाणूमुक्त असणे आवश्यक असते कारण त्यामुळे त्यांनाही रोग होऊ शकतात व इतरांमध्येही त्याचा प्रसार होऊ शकतो. आतापर्यंतच्या अभ्यासात असे लक्षात आले आहे, की स्मार्टफोन किंवा मोबाइल फोनवर अनेक प्रकारचे जंतू असतात. ब्रिटनमधील सरे येथील संशोधनानुसार तेथे सर्वात जास्त जीवाणू हे स्मार्टफोनवर आरामात वास्तव्य करीत असतात. त्यात स्टॅफिलोकॉकस ऑरस हा जीवाणूही असतो त्यामुळे अनेक रोग होतात. असे असले तरी डॉक्टरांचे फोन अजूनही जीवाणूमुक्त नाहीत त्यामुळे हे फोन जीवाणूमुक्त असावेत यासाठी ब्लॅकबेरीने पुढाकार घेतला आहे. कॅनडातील मॅकेन्झी रिचमंड हिल हॉस्पिटलमधील डॉ. अविव ग्लॅडमन यांच्या मते कर्मचाऱ्यांनी जर त्यांचे स्मार्टफोन अल्कोहोलच्या टिश्यू पेपरने पुसले तर ते जंतूमुक्त राहू शकतात. त्यात फोनवर येताना अल्कोहोलचा टिश्यू पेपर फिरवावा व जातानाही तसेच करावे.
आरोग्य क्षेत्राची ही गरज लक्षात घेऊन ब्लॅकबेरीने सिस्को सिस्टीम्स व थॉटवायर यांच्याशी करार केला असून मॅकेन्झी रिचमंड हिल रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांना पोर्टेबल अलर्ट व मेसेिजग सिस्टीम देण्याचे ठरवले आहे. कंपनीने ते सॉफ्टवेअर व स्मार्टफोन एकत्रच वापरता येतील अशी सोय करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे आता भारतातही काही मोबाइल कंपन्यांनी अशी सोय करायला हरकत नाही कारण तसे करणे अत्यंत सोपे आहे, फक्त स्मार्टफोनने आठवण दिल्यानंतर घाईगडबडीत वावरणाऱ्या परिचारिका व डॉक्टरांनी त्यांचा स्मार्टफोन किंवा मोबाइल हा अल्कोहोलच्या टिश्यू पेपरने पुसायला हवा, अन्यथा मौल्यवान संदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने शेवटी आपण वैज्ञानिकांच्या भाषेत सांगायचे तर टॉयलेट हातात घेऊनच हिंडणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 5:19 am

Web Title: blackberry to launch bacteria free smartphone
टॅग : Smartphone
Next Stories
1 श्रीनगरमध्ये हिसाचार एका पोलिसासह दोन जखमी
2 मन की बातः पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्यांवर मौन कायम
3 रशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन
Just Now!
X