भाजपने निवडणुकीपूर्वीच परदेशातील काळा पैसा शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्या. शहा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली असतानाच आता काळा पैसा शोधण्याच्या या कामात आणखी एक पाऊल पुढे पडले असून भारतीय संस्थांना स्वीत्र्झलडमधील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाच्या साठेबाजीबाबत माहिती मिळाली आहे.
चौकशीकर्त्यांनी यातील स्वीस गुप्तता संकेताच्या अडचणीवर मार्ग काढीत नुकत्याच कराच्या जाळ्यात आणण्यात आलेल्या १०० खातेधारकांना त्यांच्या व्यक्तिगत बँक ताळेबंदाचा तपशील मागितला आहे. त्यांच्यावर कर चुकवल्याबद्दल कमीत कमी कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. यातून मिळणारा कर हा ५० ते ८० कोटींच्या घरात असू शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे. स्वीत्र्झलडने असहकार्य करण्याचे कारण तेथील काही देशांतर्गत अडथळे हे आहे.  ही शर्यत करीत अर्थमंत्रालय काळा पैसा शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.