15 December 2019

News Flash

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू, ४१ जखमी

अफगाणिस्तानच्या नागरहार प्रांतात शनिवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला कार बॉम्बस्फोटात उडवून घेतले. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानच्या नागरहार प्रांतात शनिवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला कार बॉम्बस्फोटात उडवून घेतले. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत. नागरहार प्रांतातील रोदात जिल्ह्यात हा स्फोट झाला.

रमजानचा पवित्र महिना संपत असतानाच अफगाणिस्तानात हा स्फोट झाला. तालिबानी दहशतवादी आणि अफगाणी सुरक्षा पथकांमध्ये आठ दिवसांसाठी शस्त्रसंधीचा करार झाला होता. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी ही घोषणा केली होती. त्या दरम्यान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने अफगाणिस्तान हादरले.

First Published on June 16, 2018 10:38 pm

Web Title: blast at afganistan
टॅग Blast,Terror Attack
Just Now!
X