कासिमपूर येथे हरदुआगंज औष्णिक वीज प्रकल्पाच्या ठिकाणी बॉयलरचा स्फोट होऊन तीन ठार व इतर १२ जण जखमी झाले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अवधेश तिवारी यांनी ही माहिती दिली. बॉयलरच्या स्फोटाचे कारण समजलेले नाही. सात जखमींना एएमयूच्या नेहरू मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रकल्पाच्या ठिकाणी बरेच लोक जमले होते त्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2015 4:21 am