20 February 2019

News Flash

कोचीन शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, १३ जखमी

जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

कोची शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या 'सागर भूषण' जहाजावर स्फोट झाला.

कोचीन शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटामुळे ५ कामगार ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतले असून बचावकार्य सुरू आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोचीन शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. अजूनही दोन कामगार त्या टाकीत असल्याचे समजते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत. महाशिवरात्री असल्यामुळे कोचीन शिपयार्ड आज बंद आहे. पण दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरू आहेत. नौदलाचे अग्निशामक दलही घटनास्थळी आले असून  आग आटोक्यात आली आहे.

First Published on February 13, 2018 12:05 pm

Web Title: blast in kochi shipyard 4 dead 13 injured