रुग्णालयात उपचार सुरु असताना तोंडात स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे ही घटना घडली आहे. बुधवारी रात्री महिलेने विषप्राशन केलं होतं. यानंतर उपचारासाठी महिलेला अलीगढ येथील जे एन मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं होतं.
डॉक्टरांनी महिलेवर उपचार करण्यास सुरुवात केली असता यादरम्यान तोंडात स्फोट झाला. विष बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तोंडाद्वारे नळी टाकली असता अचानक हा स्फोट झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सल्फरीक अॅसिड घेतलं होतं. नळी आतमध्ये टाकली असता ऑक्सिजनशी संपर्क आल्यानेच हा स्फोट झाला असावा अशी शक्यता आहे. दरम्यान हा स्फोट होण्याचं नेमकं काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 4:14 pm