06 July 2020

News Flash

इस्लामाबादेत फळबाजारात बॉम्बस्फोट; २३ ठार, १०० जखमी

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या सीमेवर असलेल्या गर्दीच्या फळबाजारात बुधवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात २३ जण ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.

| April 10, 2014 06:03 am

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या सीमेवर असलेल्या गर्दीच्या फळबाजारात बुधवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात २३ जण ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.
 सेक्टर १-११ मध्ये झालेल्या या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार ४-५ किलोचे बॉम्ब हे पेरूच्या टोपलीत ठेवण्यात आले होते. लिलावात भाग घेण्यासाठी लोक आले असता या बॉम्बचा स्फोट झाला. पाकिस्तान इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेचे कुलगुरू प्रा. जावेद अक्रम यांनी मृतांचा आकडा २३ असल्याचे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १६ जखमींना उपचारासाठी रावळपिंडीला नेण्यात आले आहे.  बॉम्बस्फोट घडला, त्या वेळी बाजारात सुमारे दोन हजार लोक आले होते.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, की पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा कडे केले असून बॉम्ब निकामी करणारे पथक हे या ठिकाणी शोध घेत आहे. न्यायालयाच्या आवारातील स्फोटानंतर इस्लामाबाद येथे महिनाभराने बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2014 6:03 am

Web Title: blast kills 23 in pakistani city of rawalpindi close to capital
टॅग Blast,Pakistan
Next Stories
1 पर्रिकर गोव्यातच राहावेत ही तर उपमुख्यमंत्र्यांची इच्छा..
2 परवेझ मुशर्रफ यांना कराचीत हलविण्याच्या हालचाली?
3 चीनच्या प्रदूषणास रोखण्यासाठी नवी संकल्पना
Just Now!
X