नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी कमी तीव्रतेचा बॉम्ब स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. पण त्यामागे संदेश देण्याचा हेतू होता. “हा स्फोट कशा पद्धतीने घडवण्यात आला ? यामागे कुठली संघटना आहे? हे शोधून काढण्यासाठी भारतीय आणि इस्रायली तपास यंत्रणा एकत्र काम करत आहेत” असे इस्रायलाचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी सांगितले.

बॉम्ब आणि घटनास्थळाच्या प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीतून PETN प्रकारची स्फोटक वापरण्यात आल्याचं सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितलं. PETN ही लष्कराकडून वापरली जाणारी स्फोटक आहेत. ही स्फोटक सहज उपलब्ध होत नाहीत. यापूर्वी अल कायदा सारख्या संघटनांनी बॉम्ब बनवण्यासाठी PETN चा वापर केला होता.

Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

तपासकर्त्यांना घटनास्थळावरुन “Hi-Watt” 9 वोल्ट बॅटरीचे काही अवशेषही सापडले आहेत. याआधी इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाने बॉम्ब बनवण्यासाठी अशा प्रकारच्या बॅटरीचे वापर केला होता, असे सूत्रांनी सांगितले. इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी बॉम्ब बनवण्यासाठी सहजतेने उपलब्ध होणाऱ्या अमोनियम नायट्रेटचा वापर करायचे. डॉ. अब्दुल कलाम मार्गावर इस्रायली दूतावासाचे कार्यालय आहे. इथे एका मोठया फुलदाणीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी संध्याकाळी पाचनंतर बॉम्बस्फोट झाला. तिथे पार्किंग केलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यानंतर काही तासांनी पॅरिसमध्ये इस्रायली दूतावासाजवळ प्लांट केलेला बॉम्ब सापडला. त्यामुळे दिल्लीतील ही घटना आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असू शकते, त्या अंगाने तपास सुरु आहे.

२०१२ साली दिल्लीतच इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्याच्या कारवर हल्ला करण्यात आला होता. त्याचदिवशी जॉर्जियामध्ये इस्रायली दूतावासाजवळ पार्क केलेल्या गाडीमध्ये बॉम्ब सापडला होता. थायलंडमध्येही इस्रायली दूतावासाजवळ हल्ला झाला होता. या तिन्ही हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा दाट संशय होता. आता सुद्धा दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर संशयाची सुई इराणकडे आहे.