चीनची राजधानी बीजिंगमध्ये अमेरिकन दुतावासाबाहेर भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झाला तेव्हा दुतावासाबाहेर अधिकारी आणि लोकांची गर्दी होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने दुतावासाच्या गेटवर बॉम्ब फेकल्यानंतर हा स्फोट झाला. अद्याप स्फोटात कोणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हा स्फोट दुतावासाच्या आतमध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याआधीच गेटवर हा स्फोट झाला अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाल्याचं कळत आहे. स्फोटात पोलिसांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.

या स्फोटावर चिनी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्फोटानंतर दुतावास आणि आजुबाजूचा परिसर बंद ठेवण्यात आला आहे.