News Flash

तुर्कस्तानमध्ये नाव दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू

या अपघातानंतर २५ जणांना वाचविण्यात यश आले आहे.

तुर्कीस्तानकडून ग्रीसकडे जाणाऱ्या नावेला अपघात झाल्यामुळे १२ स्थलांतरितांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती तुर्कीस्तानमधील वृत्तसंस्थेने दिली आहे. या अपघातानंतर २५ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
तुर्कीस्तान नाविक दलाच्या जवानांनी लहान बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. ही नाव तुर्कीस्तानमधील आयव्हॅलिकवरून ग्रीसमधील लेबॉस येथे जाणार होती. बचाव पथकाला २५ जणांना वाचविण्यात यश आले. युद्धग्रस्त सीरियातील स्थलांतरित मोठय़ा प्रमाणात तुर्कीस्तानमध्ये आश्रय घेत आहेत. या वर्षी युरोपात स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात ३ हजार स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही स्थलांतरित ग्रीसमध्ये आश्रय घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 12:16 am

Web Title: boat sink in turkey 12 die
Next Stories
1 गुजर, एसबीसींना ५ टक्केआरक्षणाची अधिसूचना जारी
2 हिंदू- मुस्लिम स्वत:हून भांडत नाहीत, त्यांच्यात भांडणे लावली जातात- सोनिया गांधी
3 ‘दादरी प्रकरणामुळे मोदींची प्रतिमा कधी नव्हे इतकी कलंकित झाली’
Just Now!
X