News Flash

बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी संशयितास अटक

बिहारमधील बोधगया येथील महाबोधी परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. विनोद मिस्त्री असे या संशयिताचे नाव असून त्याचे

| July 8, 2013 11:29 am

बिहारमधील बोधगया येथील महाबोधी परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. विनोद मिस्त्री असे या संशयिताचे नाव असून त्याचे ओळखपत्र घटनास्थळावरील तपासात पोलिसांना सापडले. त्यानुसार मिस्त्रीला ताब्यात घेण्यात आले आहे व त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर तपासात सापडलेल्या ओळखपत्राच्यामार्फत एका व्यक्तीला बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बोधगया परिसरातील ‘ कॅमेरा(सीसीटीव्ही)चित्रीकरणा’चे विश्लेषणही सुरू आहे. त्यानुसार आणखी काही व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.” तसेच महाबोधी मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण आम्हाला पूर्णरित्या मिळाले आहेत. मिळालेल्या चित्रीकरणानुसार मंदिरपरिसरातील सर्व सुरक्षा रक्षक घटनास्थळी उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यानुसार सुरक्षेची कोणतीही हयगय बाळगण्यात आली नव्हती असेही पोलिससुत्रांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 11:29 am

Web Title: bodhgaya serial blasts one suspect detained cops release cctv footage
टॅग : Bihar,Terror Attack
Next Stories
1 सिकंदराबादमध्ये हॉटेलची इमारत कोसळली, १२ जणांचा बळी
2 बोधगयातील बॉम्बस्फोटप्रकरणी एक जण ताब्यात
3 अमेरिकेत विमान अपघातात २ ठार, १८२ जखमी
Just Now!
X