News Flash

बुद्ध मंदिरातील फ्रीजमध्ये सापडले वाघाच्या ४० बछड्यांचे मृतदेह!

या घटनेनंतर मंदिरातील भिख्खू वाघांचे अवैध प्रजनन आणि तस्करीत गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

In this photo released by the Department of National Parks, Wildlife and Plant Conservation, the remains of tiger cubs and a bear are laid out at the "Tiger Temple" in Saiyok district in Kanchanaburi province, west of Bangkok, Thailand, Wednesday, June 1, 2016. A Thai national parks official says authorities have found 40 dead tiger cubs in a freezer at a Buddhist temple that operated as an admission-charging zoo.(Department of National Parks, Wildlife and Plant Conservation via AP)

बँकाक येथील एका बुद्ध मंदिरातील फ्रीजमध्ये वाघाच्या ४० बछड्यांचे मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हे मंदिर ‘टायगर टेम्पल’ या नावानेही ओळखले जाते. कांचनबुरी प्रातांतील या मंदिराकडून प्राणिसंग्रहालयात प्रवेश देण्याची व्यवस्था सांभाळली जात असल्याचे राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांना मंदिरातील फ्रीजमधून बहुतांश पूर्ण वाढ झालेल्या वाघांच्या बछड्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर मंदिरातील भिख्खू वाघांचे अवैध प्रजनन आणि तस्करीत गुंतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून खाणे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फ्रीजमध्येच बछड्यांचे मृतदेह मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या प्राणिसंग्रहालयात असलेल्या १३७ वाघांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी या अधिकाऱ्याला फ्रीजमध्ये ४० बछड्यांचे मृतदेह आढळून आले. हे मृतदेह फ्रीजरमध्ये का ठेवण्यात आले, याबद्दल चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र, मंदिराच्या फेसबुक पेजवर मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मंदिराच्या माजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जन्मानंतर लगेच मृत्यू झालेल्या वाघाच्या बछड्यांना न पुरण्याचा निर्णय घेतला होता. हे मंदिर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, याठिकाणी प्राण्यांची व्यवस्थित देखभाल होत नसून येथील प्रशासन वाघांच्या तस्करीसंदर्भातील कायद्यांना न जुमानणारे असल्याचा आरोप एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:36 pm

Web Title: bodies of 40 tiger cubs found in thai temple freezer
Next Stories
1 लता मंगेशकर तथाकथित गायिका, ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने उडवली खिल्ली
2 … आणि मोरोक्कोतील विद्यापीठाने भारताचा चुकीचा नकाशा झाकला
3 महागाईचा आणखी चटका; विनाअनुदानित सिलिंडर, जेट फ्युएल महागले
Just Now!
X