News Flash

बेपत्ता सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला

इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्विसेसमध्ये होते कार्यरत

प्रातिनिधीक छायाचित्र

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्विसेसमधील अधिकाऱ्याचा मृतदेह गुरुवारी दिल्लीतील रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून कळते. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे.


जितेंदर झा असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते गेल्या ११ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज दक्षिण दिल्लीच्या पलाम भागातील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी ते मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. मात्र, पुन्हा परतले नाहीत. बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून आत्महत्येचा बनाव असल्याचा दावा केला आहे. यानंतर या प्रकरणी सर्व शक्यता विचारात घेऊन तपास करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

झा यांच्या पत्नी भावना यांनी सांगितले की, जितेंदर यांच्या सततच्या बदल्यांमुळे ते मानसिकरित्या स्थिर नव्हते. झा हे मुळचे बिहारचे रहिवासी असून गेल्या सहा महिन्यांत त्यांची अनेकदा बदली करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वे ट्रॅकचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण हे या प्रकरणात महत्वाचा भुमिका बजावू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 10:09 pm

Web Title: body of missing indian defence accounts services officer jitender jha found on rail tracks
Next Stories
1 गुजरात निवडणूक : आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल
2 Gujarat Election 2017 EXIT POLL : भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता
3 Himachal Pradesh Election 2017 Exit Poll: काँग्रेसचे साम्राज्य खालसा होणार की भाजपची संधी हुकणार?
Just Now!
X