News Flash

P-8I विमानांच्या खरेदीत झोल! स्वस्त दाखवून विकत घेतली अमेरिकेची महागडी विमान

अमेरिकन कंपनी बोईंगकडून खरेदी करण्यात आलेल्या पी ८-आय या पाणबुडी विरोधी विमानांच्या खरेदी व्यवहारावर कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय नौदलासाठी या विमानांची खरेदी करण्यात

P-8I विमानांच्या खरेदीत झोल! स्वस्त दाखवून विकत घेतली अमेरिकेची महागडी विमान

अमेरिकन कंपनी बोईंगकडून खरेदी करण्यात आलेल्या पी ८-आय या पाणबुडी विरोधी विमानांच्या खरेदी व्यवहारावर कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय नौदलासाठी या विमानांची खरेदी करण्यात आली होती. काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २००९ साली हा व्यवहार झाला होता. बोईंग आणि स्पेनच्या ईएडी/सीएएसए या कंपन्यांमध्ये मुख्य स्पर्धा होती. पण अमेरिकन कंपनीला प्राधान्य देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने या महत्वपूर्ण करारात ईएडी/सीएएसएच्या ए-३१९ विमानांची किंमत वाढवून दाखवली.

त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने प्रोडक्ट सपोर्ट कॉस्ट पॅकेज जोडले. बोईंगच्या बाबतीच प्रोडक्ट सपोर्ट कॉस्ट पॅकेजकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. बोईंग बरोबर या पॅकेजबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. खरंतर ईएडी/सीएएसएपेक्षा बोईंग बरोबरचा पी ८ -आय विमान खरेदीचा व्यवहार जास्त महागडा होता. या करारात पक्षपातीपणा करुन अमेरिकन कंपनीला २.१३ अब्ज डॉलरचे कंत्राट बहाल करण्यात आले असे कॅगने म्हटले आहे.

तांत्रिक अंगाने पाहिल्यास या अत्याधुनिक विमानामध्ये जी साधनसामग्री आहे ती सांगितल्याप्रमाणे काम करत नाहीय असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. या विमानामध्ये जी रडार सिस्टीम देण्यात आलीय त्याला काही मर्यादा आहेत. अद्यापपर्यंत सरकारने पाण्याखालील पाणबुडीच्या हालचाली, आणि आवाज टिपण्याची आधुनिक यंत्रणा खरेदी केलेली नाही. त्यामुळे वापरामध्ये असलेल्या पी-८ आय विमानांचा क्षमतेनुसार वापर होत नाहीय असे कॅगचा अहवाल म्हणतो.

भारतीय नौदलाला कराराप्रमाणे आठ पी-८ आय विमाने मिळाली असून चीन आणि पाकिस्तानच्या पाणबुडयांवर हालचालींवर लक्ष ठेवण्याची या विमानाची मुख्य जबाबदारी आहे. याच प्रकारची आणखी चार विमाने खरेदी करण्यासाठी एक अब्ज डॉलरचा करार झाला असून २०२० पर्यंत ही विमाने भारताला मिळतील. पी-८ च्या समावेशानंतर नौदलाने रशियन बनावटीची टीयू-१४२ ची टेहळणी विमाने सेवेतून निवृत्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2018 2:29 pm

Web Title: boeing p 8i aircraft deal question by cag
टॅग : Indian Navy
Next Stories
1 करुणानिधींच्या हस्ते बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार
2 २१,००० पेक्षा अधिक भारतीय अनधिकृतरित्या करताहेत अमेरिकेत वास्तव्य
3 कायम लीडर म्हटले, आता शेवटचे एकदा अप्पा म्हणू का?- एम.के.स्टॅलिन