23 January 2021

News Flash

अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र आसिफ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अभिनेते आसिफ बसरा हे गेल्या पाच वर्षांपासून मॅक्लोडगंजमध्ये एका मैत्रिणीसोबत भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. त्यांची मैत्रिण परदेशी असून ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.

आसिफ हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आशिकी २, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे, काय पो चे अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 4:38 pm

Web Title: bollywood actor asif basra commits suicide in dharamshala himachal pradesh avb 95
Next Stories
1 भारत ‘या’ देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र, पुढच्यावर्षी होणार करार
2 जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता-तेजस्वी यादव
3 “न्या. चंद्रचूड म्हणजे… “; त्या वक्तव्यामुळे कुणाल कामराविरोधात थेट अ‍ॅटर्नी जनरलकडे तक्रार
Just Now!
X