News Flash

अभिनेता फराज खानचं निधन; अखेरच्या क्षणीही नव्हते उपचारासाठी पैसे

पूजा भट्टेन ट्विटरद्वारे दिली माहिती

बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. वयाच्या ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री पूजा भट्टने ‘मेहंदी’ चित्रपटातील अभिनेता फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे ट्विट पूजा भट्टने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती देशवासीयांना केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला आर्थिक मदत केली असल्याचे म्हटले जाते.

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर त्याने ‘पृथ्वी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. ‘मेहंदी’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत काम केले. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 11:33 am

Web Title: bollywood actor faraaz khan passed away avb 95
Next Stories
1 वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगनमध्ये बायडेन विजयी पण महत्त्वाच्या फ्लोरिडात ट्रम्प आघाडीवर
2 देशात २४ तासांत ४६ हजार २५४ नवे करोनाबाधित, ५१४ रुग्णांचा मृत्यू
3 रस्त्यावर फेकलेला कचरा आणि ८० किमी प्रवास… गावकऱ्यांनी ‘त्यांना’ घडवली अद्दल
Just Now!
X