News Flash

सुष्मिता सेनने मुकूट घातलेल्या ‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन

चेल्सीने १९९५मध्ये 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट आपल्या नावावर केला होता.

चेल्सी स्मिथ, सुष्मिता सेन

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने १९९५ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावलेल्या चेल्सी स्मिथच्या निधनावर शोक व्यक्त केला. कर्करोगाने त्रस्त असलेल्या चेल्सीचं वयाच्या ४५व्या वर्षी शनिवारी निधन झालं. अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चेल्सीने १९९५मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट आपल्या नावावर केला होता.

‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकताना त्यावेळी अभिनेत्री सुष्मिता सेनने चेल्सीला मुकूट घातला होता. ‘तिचं हास्य आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व मला अतिशय आवडायचं. माझी प्रिय मैत्रीण आणि १९९५ची मिस युनिव्हर्स चेल्सी स्मिथ हिच्या आत्म्याला शांती लाभो,’ असं ट्विट सुष्मिताने केलं. सुष्मिताने ही स्पर्धा १९९४ मध्ये जिंकली होती. या पोस्टसह सुष्मिताने चेल्सी स्मिथसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिता सेन चेल्सीला मुकूट घालताना दिसते.

१९९५ मध्ये ‘मिस युएसए’चा किताब जिंकल्यानंतर चेल्सीने ‘मिस युनिव्हर्स’च्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती विजेती ठरली होती. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 5:34 pm

Web Title: bollywood actress sushmita sen mourns death of miss universe 1995 chelsi smith
Next Stories
1 काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात ‘राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद’च्या घोषणा
2 चलो इनकी करे विदाई, भाजपाई और महंगाई, काँग्रेसचा नारा
3 VIDEO: ‘पेट्रोलची किंमत वाढवली पाहिजे’ अशी घोषणा देणाऱ्याला मारहाण
Just Now!
X