26 September 2020

News Flash

‘ये नया हिंदुस्थान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’; सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव

ऋषी कपूर, अनुपम खेर, कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चार आरोपी ठार झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेलंगणा पोलिसांचं कौतुक केलं आहे. ऋषी कपूर, अनुपम खेर, कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शाब्बास तेलंगणा पोलीस, माझ्याकडून तुमचं अभिनंदन, असं ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट केलं आहे. तर ‘जय हो तेलंगणा पोलीस’ अशा शब्दांत अभिनेते अनुपम खेर यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. ‘असा क्रूर अपराध करणाऱ्यांविरोधात ज्या लोकांनी आवाज उठवला होता आणि आरोपींना कठीण शिक्षेची मागणी केली होती, त्या सर्वांनी माझ्यासोबत बोला- जय हो’, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल हिने ‘उरी’ या चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. ‘ये नया हिंदुस्थान है, घर मै घुसेगा भी और मारेगा भी..’ असं तिने म्हटलंय. अभिमानाने ऊर भरून येत आहे, असे उद्गार तिने काढले.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 11:05 am

Web Title: bollywood celebrity reaction on hyderabad encounter ssv 92
Next Stories
1 हैदराबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांकडून फुलांचा वर्षाव
2 #HyderabadEncounter: “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”
3 लवकरच निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवणार?
Just Now!
X