07 March 2021

News Flash

बॉलिवूडच्या नावाजलेल्या छायाचित्रकाराने केली आत्महत्या

सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या चिठ्या सापडल्या

प्रातिनिधीक छायाचित्र

बॉलिवूडचे नावाजलेले छायाचित्रकार जगदीश कांबळे उर्फ जगदीश औरंगाबादकर यांनी त्यांच्या गुरुग्राम येथील घरी गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. ६५ वर्षीय या छायाचित्रकाराचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. इंग्रजी संकेतस्थळ फिल्मीमंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ ते १२.३० च्या मधे ही घटना घडली. एक वर्षापूर्वी पत्नी आणि मुलांनी प्रॉपर्टीसंदर्भात झालेल्या वादामुळे पत्नी आणि मुलं त्यांना सोडून गेली होती. कुटूंबाने सोडल्यानंतर जगदीश एकटेच त्यांच्या या घरात राहत होते.

पोलिसांना आत्महत्या करताना त्यांनी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या चिठ्या सापडल्या होत्या. त्यांनी या चिठ्या त्यांच्या वेगवेगळ्या मित्रांना लिहिल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. नक्की त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अजून कळू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 7:07 pm

Web Title: bollywood photographer jagdish kamble aka jagdish aurangabadkar committed suicide
Next Stories
1 खेळता-खेळता वडील अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू
2 ‘आप’च्या २७ आमदारांचे सदत्यत्व धोक्यात
3 संरक्षणमंत्री बोलत नाही तर कृती करतात – मोदी
Just Now!
X